थाटूनी संसार सुखाचा,
मला तुझाचं होवून रहायचयं..

हातात घेवूनी हात तुझा,
मला तुला मुंबईला फिरवायचयं…

डोळ्यात बुडून अखंड तुझ्या,
माझ्या मनातल्या भावनांना मोकळं करायचयं..

बांधुनी सातजन्माचं नातं तुझ्याशी,
माझी राणी म्हणुन मिरवायचयं…

करुनी तुला नवरी माझी,
तुला फुलासारखं जपायचयं…

मी फक्त तुझा आणि तुझाचं असेल,

कारण ???
तुला माझ्या आयुष्याची भागीदार करायचयं..

तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात,
मला हक्काचं स्थान मिळवायचयं…

तु माझी कायमची झाल्यावर,
आयुष्य तुझ्यावर अर्पण करायचयं..

आयुष्य तुझ्यावर अर्पण करायचयं…!!!

Advertisements

IT IS EASY TO LOVE A WOMAN TO HER CORE
When she is sad just hold her hands and tell her that things will work out soon…she will feel better. When she is crying just wipe her tears and give her a hug..she will calm down…When she is angry just stay cool and normal and she will be back to normal soon. When she is arguing or fighting with you just hold her in your arms and kiss her ..she will melt in your arms… When she is depressed or shattered just keep her head in your lap and she will feel safe and secure..Now you know it is really simple to make a woman feel loved to the core…!


Vinayak (Vinay)

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत..
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?

शाप देत बसायचं की दुवा देत हसायच तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं,

तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं.

कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायच तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?

काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायच तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत तुम्हीचं ठरवा!

मंगेश पाडगांवकर