आई असते म्हणोनी . . .

“मुलाला बरं वाटावं म्हणून थरथरत्या हातात पोथी धरून मंदीरात बसलेली आई . . .    मूकबधीर मुलाला प्रेमानं सांभाळणारी आई . . .    मुलीला शिकवून मोठ्या पदावर पाहण्याचं स्वप्न रंगवणारी आई . . . कितीहा संकटं आली तरी घारीसारखं आपल्या मुलांचं रक्षण करणारी आई . . . किती रूपं असतात ना. .   आईच्या मायेची . . .!  कधी उदास, एकटं वाटलं की आईची फोटोतली हसरी नजर सोबत करते. . .   जगण्याची उमेद देते!”

– © विवा

Advertisements

अपयश आणि निराशा

अपयश आणि निराशा दोन्ही हातात हात घालून येतात, परिक्षा घेतात, गती कमी करतात परंतु ; आपल्याला थांबवत कधीच नाहीत, उलट आपल्यला बरंच काही शिकवून जातात.

– © विवा

प्रेम

एखाद्यावर प्रेम करताना अहंकाराला स्वतःपासून दूरच ठेवा. “प्रेम” मिळवण्यासाठी अहंकार गमावलात तरी चालेल, पण ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून “प्रेम” करता त्या व्यक्तीला तुमच्या अहंकारामुळे गमावू नका. कारण “प्रेम” ही एखाद्यावरच मेहेरबान होणारी आणि एखाद्यालाच लाभणारी दुर्मीळ संपत्ती आहे.

– © विवा

माझेच अनुभवाचे बोल . . .

आयुष्यात भूक, अपमान आणि मिळालेला अनुभव या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. माझ्या मते आयुष्याची वाट चालताना भेटलेले हेच तीन गुरू माणसाला त्याचं स्वतःचं आयुष्य समृध्द करण्यासाठी प्रेरणा देतात.

– © विवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑