तू परत येशील का?

​शब्द नव्हते मन रितं करण्यासाठी, आसुसलेल्या भावनांनी मात्र डोळ्यांतून वाट काढली होती, तुला जाताना पाहून..

शेवटचा तुझा हसरा चेहरा, मला अजूनही आठवतोय..   तू अजूनही असल्याचा भास देतोय.. विरलेल्या शब्दांनाही अक्षरशः भिती वाटते आता, डोळ्यांतून ओघळणाऱ्या या आसवांची..

माणसांच्या या गर्दिमध्ये अडखळलेली माझी मलूल पावले मात्र, फक्त तुलाच शोधतायत आता, तुझ्या ह्या भासामुळे.. कारण तुझी खूप सवय झाली होती, गर्दीत हातात हात घेऊन सोबत चालण्याची.. तीच गर्दी आज नकोशी वाटत होती…

परवा तुझा वाढदिवस होता, घरी तुझी आठवण काढत होते सर्वचजण.. परंतु माझ्या भावना अजूनही डोळ्यांतून वाहत होत्या… मला शांत करता करता आईला सुध्दा खूप गहिवरून आलं होतं, फक्त तुझ्या आठवणी ने..

माझे डोळे पुसायला तिने पदर पुढे केला तर, आईने तू भेट दिलेली साडीच नेसली होती, आईचा हात तिथेच निश्चल झाला आणि तीलाही तिच्या भावना आवरता आल्या नाहीत..

तितक्यातच बाबांना कपाट साफ करताना माझ्या वाढदिवसाला तू भेट दिलेलं घड्याळ सापडलं, ते घेण्यासाठी मी पुढे सरसावलो, परंतु ते ही वेळ बरोबर नसल्याचं दाखवत होतं, त्या घड्याळातील वेळ आणि तारीख त्याच दिवसाची आठवण करून देत होतं, जेंव्हा आपण दोघं शेवटचं भेटलो होतो..

निरस आणि छळणाऱ्या या भावनांचां भार आता माझ्या मनाला ही सोसेनासा झालाय… काळजात बिलगून राहिलेल्या या तुझ्या सुख-दुखाच्या आठवणींचा खूप त्रास होतो अधूनमधून, भिंतीवर टांगलेली सजावट देखील तुझ्या कलेची साक्ष देतेय, त्या कलेलाही तू पोरकं का गं केलंस?

ऑफिस ला जाताना तू भेट दिलेला शर्ट मी घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील आता खूपच दाटत होता, वेळ खूप सरून गेलीये याची जाणीव करून देत होता.. कित्ती काळजी घ्यायचीस तू आम्हा सर्वांची?

तू जेंव्हा घरी यायचीस, घरातील सर्व कामं तूच एकटी करायचीस, आईला कसलाही जाच न देता..  वर्षे लोटली तुझ्या हातचं जेवण खाऊन, तितकच चविष्ट, रूचकर आणि पौष्टिक, तुझी खासियतच होती ती…

शेवटचं आलिंगन ही खूपच अल्पकालीन होतं, तुला दूर करावं असं जराही वाटत नव्हतं.. पुढे चालत आलो, पाठीमागे वळून पाहिलं तर तुझा हसरा चेहराच दिसत होता.. परंतु नियतीला हे पटलं नव्हतं…

शोक अनावर होतो मला, आपोआपच पापण्या पाणावतात.. ओशाळलेल्या आठवणी कधी कधी हसवतात पण, जास्त रडवतात; सोबत फक्त तुझा फोटो आणि आठवणीच असतात आता…

काय करू ह्या जगात असा एकटाच, जरा मला तू सांगशील का? ह्या विक्षिप्त जगात असं वावरायला नकोसं वाटतंय आता, मोडून पडलेल्या आपल्या सुंदर स्वप्नांना सावरायला तू परत येशील का?

– © विवा

Advertisements

खेल..

​”प्यार प्यार में खेल खेल गयी वह,

इंतजार के नाम पे सिर्फ दर्द दे गयी वह,

खुद तो बड़ी शातीर निकली; उसकी झूठ़ी आहटों से,

मेरी खामोश नज़रें ढुँढती रही उसे मेरे खयालों के पन्नों में,

लेकिन पन्ने तो सारे फटें निकलें,

जिन्हें जिद्दोजहत उसने आजमाया था।”


– © विवा

बिछड़न

“सुकुन सा महसूस हुआ था उस दिन मुझे,

जिस दिन वह बोली थी मिलने आयेगी जरूर,

जिस दिन वक्त से मैंने पुछा, क्या था उसका कसूर; तो समझ में आया उसका मुझसे मिलन ही कुछ आधा-अधूरा था,

कंबख्त वक्त ने उसकी राह न देंखी, के ले गया वह उसे मेरे नसीब से छुडाकर,

बोली थी, डोली में सजधजकर आयेगी वह मेरे घर जरूर,

लेकीन, वक्त ने हि कुछ पल ऐसे लिखे थें मेरे नसीब में कि; बिच में “बिछड़न” आ बैठी।”

– © विवा

‘उन्हें’ भुला न सका..

“गमों को मैंने कोरे कागज पर उतारा था, लमहे गुजारे थे, बड़ी मुश्किल से उन्हें सँवारा था,

डुब रही थी नैया मेरे ऐतबार कि, न कोई किनारा था और ना ही कोई साथी।

बिछ़डे पलों से सँवरना सिख लिया था, उन गमों को भुलना भी सिख लिया था,

पर जज्बात ऐसे थे मेरे, कि ‘उन्हें’ मैं भूला न सका।”


– © विवा

कविता

​कविता, अढळ, अटळ, सुनिश्चित अर्थांची,

कविता, बेधुंद प्रेषितांची, मुक्त बंधनांची,

मुक्त गंधांची, निराळ्या रंगांची, वेगळ्या ढंगांची,

ती अशी एक कविता..


मज कावेत घेणारी, शब्दांचा घास भरवणारी, विविध अर्थांची, विविध छटांची, मज नकळतच आपल्या प्रेमात पाडणारी,

ती अशी एक कविता..


मनातील श्वेत पर्नावर उतरणारी, कधी हसवणारी, कधी रडवणारी, आठवणींच्या जंगलात सैर करायला लावणारी,

ती अशी एक कविता..


मनाच्या एका कोपऱ्यात उसासे टाकणारी, आठवणींच्या जगात रडवणारी, ध्येयाधुंद करणारी, जुजबी-निर्भिड,

ती अशी एक कविता..


अप्रत्यक्ष प्रत्ययावत करणारी, कधी मनाचा ठाव घेणारी, फुल-पाकळ्यांत, पडणाऱ्या पावसात मंद-मंद खुलणारी, फुलणारी, भिजवणारी,

ती अशी एक कविता..


कधी मोकळ्या रानात बागडणारी, पक्ष्यांच्या किलकिलाटांनी उभारी धरणारी, पाठाच्या पाण्यात खळखळणारी, झाडांच्या फांद्यांवर सुळसुळणारी,

ती अशी एक कविता..


राधा-रमणाची, संत कुबेराची, मुक्ताईची, नामदेवाची, विविध पौराणिकांची, साहित्यिकांची..

पूर्वेकडून पश्चिमेकडे टकमक बघणारी, उत्तरेकडून दक्षिणेकडे हरवणारी, सत्कर्मांची माळ गुंफणारी,

ती अशी एक कविता..


कविता संगिताला नाचायला लावणारी, चाळाला छुमछुम करायला लावणारी, तबल्यावर हात मारायला लावणारी,

मैफील जमवणारी तर कधी एकटीच एकांतात रमणारी, मनाच्या कप्प्यातून अबदार ओठांवर येणारी,

ती अशी एक कविता..


अचंबित करणारी, बेभान करणारी, कधी लाजवणारी कधी, कधी हळहळणारी, मंद मंद प्रकाशात, मनाच्या कालवलेल्या चिखलात कमळासारखी फुलणारी,

ती अशी एक कविता..


कविता तुमची, कविता माझी, कविता साऱ्या विश्वाची,

नकळत ओठांवर येणारी, शब्दांची भुकेलेली परंतु शब्दसमुहांची भूक भागवणारी, शब्दांत श्वास शोधणारी,

ती अशी एक कविता..


तुमची – माझी, माझी – तुमची, सर्वांची लाडकी,

अल्लड, उत्साही, उताविळ, चावट,

ती अशी एक कविता..


– © विवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑