तू परत येशील का?

​शब्द नव्हते मन रितं करण्यासाठी, आसुसलेल्या भावनांनी मात्र डोळ्यांतून वाट काढली होती, तुला जाताना पाहून..

शेवटचा तुझा हसरा चेहरा, मला अजूनही आठवतोय..   तू अजूनही असल्याचा भास देतोय.. विरलेल्या शब्दांनाही अक्षरशः भिती वाटते आता, डोळ्यांतून ओघळणाऱ्या या आसवांची..

माणसांच्या या गर्दिमध्ये अडखळलेली माझी मलूल पावले मात्र, फक्त तुलाच शोधतायत आता, तुझ्या ह्या भासामुळे.. कारण तुझी खूप सवय झाली होती, गर्दीत हातात हात घेऊन सोबत चालण्याची.. तीच गर्दी आज नकोशी वाटत होती…

परवा तुझा वाढदिवस होता, घरी तुझी आठवण काढत होते सर्वचजण.. परंतु माझ्या भावना अजूनही डोळ्यांतून वाहत होत्या… मला शांत करता करता आईला सुध्दा खूप गहिवरून आलं होतं, फक्त तुझ्या आठवणी ने..

माझे डोळे पुसायला तिने पदर पुढे केला तर, आईने तू भेट दिलेली साडीच नेसली होती, आईचा हात तिथेच निश्चल झाला आणि तीलाही तिच्या भावना आवरता आल्या नाहीत..

तितक्यातच बाबांना कपाट साफ करताना माझ्या वाढदिवसाला तू भेट दिलेलं घड्याळ सापडलं, ते घेण्यासाठी मी पुढे सरसावलो, परंतु ते ही वेळ बरोबर नसल्याचं दाखवत होतं, त्या घड्याळातील वेळ आणि तारीख त्याच दिवसाची आठवण करून देत होतं, जेंव्हा आपण दोघं शेवटचं भेटलो होतो..

निरस आणि छळणाऱ्या या भावनांचां भार आता माझ्या मनाला ही सोसेनासा झालाय… काळजात बिलगून राहिलेल्या या तुझ्या सुख-दुखाच्या आठवणींचा खूप त्रास होतो अधूनमधून, भिंतीवर टांगलेली सजावट देखील तुझ्या कलेची साक्ष देतेय, त्या कलेलाही तू पोरकं का गं केलंस?

ऑफिस ला जाताना तू भेट दिलेला शर्ट मी घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील आता खूपच दाटत होता, वेळ खूप सरून गेलीये याची जाणीव करून देत होता.. कित्ती काळजी घ्यायचीस तू आम्हा सर्वांची?

तू जेंव्हा घरी यायचीस, घरातील सर्व कामं तूच एकटी करायचीस, आईला कसलाही जाच न देता..  वर्षे लोटली तुझ्या हातचं जेवण खाऊन, तितकच चविष्ट, रूचकर आणि पौष्टिक, तुझी खासियतच होती ती…

शेवटचं आलिंगन ही खूपच अल्पकालीन होतं, तुला दूर करावं असं जराही वाटत नव्हतं.. पुढे चालत आलो, पाठीमागे वळून पाहिलं तर तुझा हसरा चेहराच दिसत होता.. परंतु नियतीला हे पटलं नव्हतं…

शोक अनावर होतो मला, आपोआपच पापण्या पाणावतात.. ओशाळलेल्या आठवणी कधी कधी हसवतात पण, जास्त रडवतात; सोबत फक्त तुझा फोटो आणि आठवणीच असतात आता…

काय करू ह्या जगात असा एकटाच, जरा मला तू सांगशील का? ह्या विक्षिप्त जगात असं वावरायला नकोसं वाटतंय आता, मोडून पडलेल्या आपल्या सुंदर स्वप्नांना सावरायला तू परत येशील का?

– © विवा

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: