आठवण…

​ती येते, ती छळते,
काहूर माजवते,

मनाच्या पटलावर,

कधी डोळ्यांत पाणी,

अन् भावनांध गाणी,

सूर तीचे उमटती आवेगाने,

मग अश्रू तरळती वेगाने,

अमर्याद, विस्तीर्ण अशी ती,

सांगे डोळ्यांस नजर भेदाया,

अ ते अतः पर्यंत,

जिथे फक्त तीच दिसे,

शब्द ही होती परके,

जेंव्हा जेंव्हा येते ती,

शब्दसूरांच्या मैफीलीत रंगणारी,

प्रितीची ती शाल जणू,

अन् किनार लांब तिजला,

शब्दांच्या नाजूक माळांची,

मोहरणाऱ्या या मनावर,

ती एक कवडसा जणू,

सोनेरी किरणांचा,

धारधार पिवळ्या रेषांचा,

कधी हवीहवीशी,

कधी भयप्रद, भयानक,

कधी शब्दांचे गंध टिपते,

कधी कवेत घेते,

कधी भ्रमाला चपराक,

अन् कधी शस्त्राची धार,

शुभ्र फुलांचा सुगंध जणू,

कधी असते उध्वस्त,

कधी असते उजळणी,

आयुष्यात मरेपर्यंत ती साथ देते,

चांगले वाईट अनुभव देते,

लोकांची पारख देते,

स्वतः ची ओळख देते

कधी डोळ्यांतून वाहते,

कधी मंद मंद हसते,

अन् गालावरच्या या खळीला,

हसण्याचे कारण देते,

ती एक आठवण,

मनातली साठवण,

अन् अचानक सुचते,

ही कविता.. ती एक आठवण…


विवा ©

Advertisements

नातं प्रेमाचं…

​नातं प्रेमाचं…


एक एक दिवस ते मंद मंद फुलवायचं,

काटा जरी रूतला मनाला, तरी त्यातून सावरायचं,

कितीही विरोध झाला, तरी आपण नाही घाबरायचं,

तुझं-माझं तेच आपलं म्हणत रोज ते जगायचं,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं,


रोज रोज नवं असं आपण काहीतरी शिकायचं,

दुखाच्या डोंगराला हळूच मागे सारायचं,

सुखाच्या क्षणांना दोघांनीही जाऊन बिलगायचं,

एकमेकांपासून कधी काहीच नाही लपवायचं,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं,


अहंकाराला आपण जरा जास्तच दूर ठेवायचं,

जग काय म्हणतं ते आपण नाही बघायचं,

फुस्कारलेल्या चेहऱ्यांना तिथेच गप्प करायचं,

राग-माग सारख्या शब्दांना आपल्या शब्दकोशातूनच काढायचं,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं,


दुर्गुणांचा नाश करून सद्गुणांना स्विकारायचं,

एकमेकांच्या चुकांना आपणच अलगद झेलायचं,

तशा चुका होऊ नयेत म्हणून जरा सावधच राहायचं,

हवं तिथं ओरडायचं, हक्काने रूसायचं, नि प्रेमाने हसायचं,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं,


दोष-निर्दोष ह्यांना आयुष्यात कधीच नाही आणायचं,

प्रेमाच्या मोहक झऱ्याखाली आपण दोघांनीही निखळ नहायचं,

कितीही वाईट क्षण आले तरी अलिप्त कधीच नाही व्हायचं,

हातात हात घालून नेहमीच सोबत राहायचं, खंबीरपणे,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं,


प्रेमानंच नातं टिकतं हे दुनियेला दाखवून द्यायचं,

सत्याच्या शोधात आपण नेहमी खरं बोलायचं,

कपटी-त्रयस्थाना नगन्य स्थान द्यायचं,

प्रेमानं भरलेलं आपलं असं सुंदर घर बनवायचं,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं,


सुखाच्या नाजूक वेलींवर सुंदर फुलांना फुलवायचं,

आपल्या दोघांच्या प्रेमाने त्यांना खूप खूप जपायचं,

चांगल्या विचारांचं बाळकडू त्यांना आपण पाजायचं,

बळ-बुध्दी च्या जोरावर त्यांना उंच झेपावू द्यायचं,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं,


चंद्र-चांदण्यांसारखं त्यांना आपण जपायचं,

कधी ठेच लागलीच तर प्रेमानं एकमेकांना सावरायचं,

ऐकमेकांच्या दुखाचे कधीच कारण नाही बनायचं,

हर्ष-उल्हास असावेत घरात असं नेहमीच वागयचं,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं,


कुणालाही न दुखवता आपण सुखाच्या बागेत खेळायचं,

मेणबत्ती आणि धाग्यासारखं आयुष्य सोबतच घालवायचं,

जाता जाता चार डोळे तरी पाणावतील, असं काही जगायचं,

कुणीतरी आपली आठवण काढेल असं काम करायचं,

नातं प्रेमाचं आपण दोघांनीही जपायचं.

                                             –  © विवा

तू परत येशील का?

​शब्द नव्हते मन रितं करण्यासाठी, आसुसलेल्या भावनांनी मात्र डोळ्यांतून वाट काढली होती, तुला जाताना पाहून..

शेवटचा तुझा हसरा चेहरा, मला अजूनही आठवतोय..   तू अजूनही असल्याचा भास देतोय.. विरलेल्या शब्दांनाही अक्षरशः भिती वाटते आता, डोळ्यांतून ओघळणाऱ्या या आसवांची..

माणसांच्या या गर्दिमध्ये अडखळलेली माझी मलूल पावले मात्र, फक्त तुलाच शोधतायत आता, तुझ्या ह्या भासामुळे.. कारण तुझी खूप सवय झाली होती, गर्दीत हातात हात घेऊन सोबत चालण्याची.. तीच गर्दी आज नकोशी वाटत होती…

परवा तुझा वाढदिवस होता, घरी तुझी आठवण काढत होते सर्वचजण.. परंतु माझ्या भावना अजूनही डोळ्यांतून वाहत होत्या… मला शांत करता करता आईला सुध्दा खूप गहिवरून आलं होतं, फक्त तुझ्या आठवणी ने..

माझे डोळे पुसायला तिने पदर पुढे केला तर, आईने तू भेट दिलेली साडीच नेसली होती, आईचा हात तिथेच निश्चल झाला आणि तीलाही तिच्या भावना आवरता आल्या नाहीत..

तितक्यातच बाबांना कपाट साफ करताना माझ्या वाढदिवसाला तू भेट दिलेलं घड्याळ सापडलं, ते घेण्यासाठी मी पुढे सरसावलो, परंतु ते ही वेळ बरोबर नसल्याचं दाखवत होतं, त्या घड्याळातील वेळ आणि तारीख त्याच दिवसाची आठवण करून देत होतं, जेंव्हा आपण दोघं शेवटचं भेटलो होतो..

निरस आणि छळणाऱ्या या भावनांचां भार आता माझ्या मनाला ही सोसेनासा झालाय… काळजात बिलगून राहिलेल्या या तुझ्या सुख-दुखाच्या आठवणींचा खूप त्रास होतो अधूनमधून, भिंतीवर टांगलेली सजावट देखील तुझ्या कलेची साक्ष देतेय, त्या कलेलाही तू पोरकं का गं केलंस?

ऑफिस ला जाताना तू भेट दिलेला शर्ट मी घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील आता खूपच दाटत होता, वेळ खूप सरून गेलीये याची जाणीव करून देत होता.. कित्ती काळजी घ्यायचीस तू आम्हा सर्वांची?

तू जेंव्हा घरी यायचीस, घरातील सर्व कामं तूच एकटी करायचीस, आईला कसलाही जाच न देता..  वर्षे लोटली तुझ्या हातचं जेवण खाऊन, तितकच चविष्ट, रूचकर आणि पौष्टिक, तुझी खासियतच होती ती…

शेवटचं आलिंगन ही खूपच अल्पकालीन होतं, तुला दूर करावं असं जराही वाटत नव्हतं.. पुढे चालत आलो, पाठीमागे वळून पाहिलं तर तुझा हसरा चेहराच दिसत होता.. परंतु नियतीला हे पटलं नव्हतं…

शोक अनावर होतो मला, आपोआपच पापण्या पाणावतात.. ओशाळलेल्या आठवणी कधी कधी हसवतात पण, जास्त रडवतात; सोबत फक्त तुझा फोटो आणि आठवणीच असतात आता…

काय करू ह्या जगात असा एकटाच, जरा मला तू सांगशील का? ह्या विक्षिप्त जगात असं वावरायला नकोसं वाटतंय आता, मोडून पडलेल्या आपल्या सुंदर स्वप्नांना सावरायला तू परत येशील का?

– © विवा

खेल..

​”प्यार प्यार में खेल खेल गयी वह,

इंतजार के नाम पे सिर्फ दर्द दे गयी वह,

खुद तो बड़ी शातीर निकली; उसकी झूठ़ी आहटों से,

मेरी खामोश नज़रें ढुँढती रही उसे मेरे खयालों के पन्नों में,

लेकिन पन्ने तो सारे फटें निकलें,

जिन्हें जिद्दोजहत उसने आजमाया था।”


– © विवा

बिछड़न

“सुकुन सा महसूस हुआ था उस दिन मुझे,

जिस दिन वह बोली थी मिलने आयेगी जरूर,

जिस दिन वक्त से मैंने पुछा, क्या था उसका कसूर; तो समझ में आया उसका मुझसे मिलन ही कुछ आधा-अधूरा था,

कंबख्त वक्त ने उसकी राह न देंखी, के ले गया वह उसे मेरे नसीब से छुडाकर,

बोली थी, डोली में सजधजकर आयेगी वह मेरे घर जरूर,

लेकीन, वक्त ने हि कुछ पल ऐसे लिखे थें मेरे नसीब में कि; बिच में “बिछड़न” आ बैठी।”

– © विवा

‘उन्हें’ भुला न सका..

“गमों को मैंने कोरे कागज पर उतारा था, लमहे गुजारे थे, बड़ी मुश्किल से उन्हें सँवारा था,

डुब रही थी नैया मेरे ऐतबार कि, न कोई किनारा था और ना ही कोई साथी।

बिछ़डे पलों से सँवरना सिख लिया था, उन गमों को भुलना भी सिख लिया था,

पर जज्बात ऐसे थे मेरे, कि ‘उन्हें’ मैं भूला न सका।”


– © विवा

IT IS EASY TO LOVE A WOMAN TO HER CORE
When she is sad just hold her hands and tell her that things will work out soon…she will feel better. When she is crying just wipe her tears and give her a hug..she will calm down…When she is angry just stay cool and normal and she will be back to normal soon. When she is arguing or fighting with you just hold her in your arms and kiss her ..she will melt in your arms… When she is depressed or shattered just keep her head in your lap and she will feel safe and secure..Now you know it is really simple to make a woman feel loved to the core…!


Vinayak (Vinay)

Don’t show so much LOVE on anyone because, it creates a non-curable pain when they avoid YOU…!

Create a website or blog at WordPress.com

Up ↑