बरसत होतंआभाळ सारं…

बरसत होतंआभाळ सारं…

बरसत होतं आभाळ सारं काही वर्षांपूर्वी.. वाढत होती गर्दी रातीला, गरजून बरसण्यासाठी, कधी दिवसालाच रात्र भासवण्यासाठी…

नव्हती उसंत…
ना त्याला, ना ही तिला…
आज आटलेली “ती किसनामाई” सुध्दा आर्त साद देत होती..
बरसेल आता-पुन्हा, त्याच जोमाने अशी आशा करत होती… दुथडी भरून वाहण्यासाठी.. जीवन वाटत जाण्यासाठी…

वर्षातून एकदाच येणारा “तो पाहुणा” रूसला होता, फुगला होता..
अवचित वेळी कसा बरसणार याचाच विचार करत राहिला होता…

हिरमुसलेल्या या मातीला गहिवर येईल असं वाटलं नव्हतं, बरसेल पाहून हालत तिची, असं मलाही पक्कं वाटलं होतं…

आभाळात काळवंडलेल्या छटांनी आशा पल्लवीत झाली होती..
आठवलं नंतर की गुदस्ता, चिंब भिजायला, थय-थय नाचायला, काय मजा आली होती…

झाडं, वेली, पानं, फुलं आणि साऱ्यांचीच आशा शिगेला टांगली होती.. भजनासाठी आलेली मंडळी आज जरा लवकरंच पांगली होती… “तो” येईल म्हणून..

मंदिराच्या चौथऱ्यावर पुजारी जाऊन आला नि तो आला असल्याचा संदेश घेऊन आला..
बरं वाटलं मला, बरस असाच सर्वत्र… मुसळधार..
करून टाक सारा हा शिवार हिरवागार…

माफ कर त्या “चालत्या-बोलत्या मर्कटाला”, दरिंदीपणा थांबवेल तो.. झाडं तोडण्याचा… घाण करण्याचा…

नाही ठरवणार तुला कारण दुष्काळाचे, भोगेल तोच दुष्परिणाम त्याच्या कर्माचे…

मी हात जोडतो तुला नि गाभाऱ्यात कर कटावर असलेल्या त्यालाही…
बरस तू मुसळधार.. त्याच जोमाने… जसा बरसायचास… “काही वर्षांपूर्वी….”

# कवितामाझी #सखी

पाहुणा©

लवकरच विसर पडतो…

लवकरच विसर पडतो…

लवकरच विसर पडतो, काही गोष्टींचा… काही व्यक्तींचा, काही व्यक्तिंना, काही नात्यांचा, काही नात्यांना… जवळच्या-दूरच्या… सगळ्याच..

नकळतच घडतात अशा गोष्टी, ज्या गणल्या जातात नाहक, कुणाच्या ही ना अनुरूप..

काळ येतो भकास आठवणीत, घेऊन वादळी प्रक्षोभ, तेंव्हा “तो” (मित्र/सखा/सोबती) होता साथीला, घेऊन सारथी स्वरूप…

बनतात गोष्टी त्याच्याच, ज्याच्या आठवणी लोटतात काळाबरोबर.. हरवतात क्षण ते सुवर्ण गणलेले…

वजा कर समजातले गैरसमज सारे, माऊली-भगिनी रूजवी मनधरणी, मन ना होतसे राजी त्याचे, शेवटी त्याचीच मनघडनी…

मोह-म्रुगजळ कारण तयाचे, उगाचच मनी गुढ भावना,
असता नाते मैत्रीचे नकोस खेचू मज वदना…

मित्र आहे चांगला, भला.. होता भला… असेल का तो पुन्हा चांगला?

विरले-हरवले ते क्षण कुठे, होऊन भंगुर.. येतील का ते दिवस पुन्हा भेट द्यावया, घेऊन आनंदाचे क्षण भरपूर?

पाहुणा©

बऱ्याच दिवसांनी आज काही लिहावसं वाटतंय. पण लिहावं काय हे सुचत नाहीये. याचं कारण माझ्या वैयक्तीक आयुष्यातील भूतकाळात घडून गेलेल्या काही दुर्दैवी (परंतु बहुमौलिक) घटना असाव्यात बहुदा.
7 जून 2015 रोजी मी माझ्या याच ब्लॉग साईटवर एक पोस्ट शेअर केली होती…. [[धडा]] नावाची.. तुम्ही पहा हवं तर.. अगदी तंतोतंत माझ्याही आयुष्यात असं वळण आलंच हो… जसं मी त्यामध्ये लिहीलं आहे, की कुणीतरी तुम्हाला दुखवतं, हृदय भग्न करणारे अनुभव देतं…. हाहा….. तसंच झालं…. परंतु कोणताही राग मनात न ठेवता माफ ही केलं मी त्या व्यक्तीला…
त्याच व्यक्तीने काही दिवसांपूर्वी [[कोणावरही विश्वास ठेवू नये]] असा मौलीक बोध मला दिला…. अर्थातच सावधानतेचा!
त्या व्यक्तीला मनाच्या गाभ्यापासून खूप खूप धन्यवाद..
मला कल्पना आहे, तुमच्या मनात अनेक प्रश्नांनी घर बनवायला सुरू केलं असावं..
साहजिकच,
ती व्यक्ती कोण?
कोणत्या अशा घटना घडल्या, कि त्याचा परिणाम म्हणून मी इथे अशा पध्दतीने व्यक्त झालो?
वगैरे अनुक्रमे प्रश्न उपस्थित झाले असावेत.
नका लक्ष्य देऊ, सांगण्याचा हेतू मात्र हाच कि, ती पोस्ट परत परत वाचून स्वतःमध्ये रूजवा… कारण, जगात कुणीच कुणाचं नसतं!!
नामरूपी, किर्तीरुपी उरण्यासारखं काही करा!

धडा

आयुष्य दरवेळी नवी वळणं घेतं, नवं काहीतरी शिकवतं. जेंव्हा कुणीतरी तुम्हाला दुखवतं, हृदय भग्न करणारे अनुभव देतं तेंव्हा त्यांच्यावर चिडू नका. त्यांना क्षमा करा. कारण त्यांनीच तुमच्या मानसिकतेला सदृढ बनवून तुम्हला सावध राहण्याचा, चटकन विश्वास न ठेवण्याचा नवा “धडा” दिलेला असतो.

प्रयत्न आणि नशीब

यशस्वी होणे हा नशीबापेक्षा प्रयत्नांचा भाग आहे. यश मिळविण्यासाठी आपल्याकडे या काही गोष्टी असायला हव्यात. त्या म्हणजे; आपल्याकडे इतरांपेक्षा जास्त ज्ञान हवं, इतरांहून आपलं काम जास्त आणि चांगलं हवं आणि अपेक्षा मात्र इतरांहून कमी हव्यात तसेच सामंजस्य आणि बोधामृत देखील महत्वाचं. असे काही गुण तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही!

आई असते म्हणोनी . . .

आई असते म्हणोनी . . .

“मुलाला बरं वाटावं म्हणून थरथरत्या हातात पोथी धरून मंदीरात बसलेली आई . . .    मूकबधीर मुलाला प्रेमानं सांभाळणारी आई . . .    मुलीला शिकवून मोठ्या पदावर पाहण्याचं स्वप्न रंगवणारी आई . . . कितीहा संकटं आली तरी घारीसारखं आपल्या मुलांचं रक्षण करणारी आई . . . किती रूपं असतात ना. .   आईच्या मायेची . . .!  कधी उदास, एकटं वाटलं की आईची फोटोतली हसरी नजर सोबत करते. . .   जगण्याची उमेद देते!”

विनायक विलास वावरे  (पाहुणा)©